नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १६ (ड) तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी २४ जुलै रोजी माजी महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विशेष अतिथी म्हणून सराफ कोचिंग क्लासेसच्या सुषमा सराफ, पाटील कोचिंग क्लासेसचे अनिकेत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाग क्रमांक १६ चे संयोजक मनोज देशपांडे, प्रभाग क्रमांक १६ (ड)चे अध्यक्ष गजानन निशितकर, अजय डागा, विनोद शिंदे, जयंत आदमने, नीरज दोंतुलवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १६ (ड) मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राधिका जलताडे, कविता देशमुख, हेमा आदमने, संध्या अढाळे, पुष्पा शिंदे, साधना शुक्ला बेबी सिंग, संपदा बोंडे, विनोद शिंदे, मनोज फणसे, श्रीधर जलताडे, राजीव रोडी, आनंद टोळ, निरंजन गाडगीळ, हेमंत कुळकर्णी अजय गाडगे संजय देशपांडे पराग जोशी कीर्ती पुराणिक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नीरज दोंतुलवार यांनी केले.