मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया – सुवर्णा रंगारी

– पी.ए.फाऊंडेशन तर्फे स्त्री-आरोग्याविषयक जनजागृती

नागपूर :- महात्मा गांधी इंग्लीश मिडीयम स्कूल वानाडोंगरी येथे नुकत्याच झालेल्या ‘मासिक पाळीच्या समस्या व उपाय’ यावर पी.ए.फाऊंडेशन द्वारा सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. आजच्या वैज्ञानिक काळातही महिला वर्गात मासिक पाळीबद्दल बरेच अज्ञान व अंधश्रद्धा असून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या शिष्या उमाईसा ला मार्गदर्शन करताना, मासिक पाळीबद्दल असलेल्या तथाकथित धर्मकल्पनांना खोडून मानवी शरीरात नव द्वारे असून ज्याप्रमाणे नाकातून शेंबूड येतो, डोळ्यांत चिपड येते, कानात मळ येते त्याचप्रमाणे मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून येते आणी निघून जाते त्यामुळे त्याचा विटाळ मानू नये असा वैज्ञानिक दृष्टिकोन १२ व्या शतकात दिलेला होता.

आज समाजात मासिक पाळीबद्दल अनेक चुकीच्या गैरसमजुती असून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचार आत्मसात करण्याची आज महिलांना गरज असून मासिक पाळीत पर्यावरणाला हानी पोहचवण्यार्‍या प्लास्टिक मुक्त A s k k सेनेटरी नॅपकीन चा वापर विद्यार्थींनी व महिलांनी करावा असे मार्गदर्शन पी.ए. फाऊंडेशनच्या सुवर्णा रंगारी यांनी विद्यार्थ्यीनींना केले. यावेळी पि.ए.फाऊंडेशनच्या रंजिता श्रीवास, महात्मा गांधी इंग्लीश मिडीयम स्कूलच्या दिपाली कोठे, नाजूका म्हैसकर आणि सर्व विद्यार्थीनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाची तयारी सुरू

Thu Oct 12 , 2023
– विभागीय आयुक्तांकडून संबंधित विभागांचा आढावा नागपूर :- नागपूर येथे होणाऱ्या सात डिसेंबर पासूनच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्याच्या आदेश दिले. आजच्या बैठकीला महानगर पालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपअभियंता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com