नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारांचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, राजीव गांधी नगर, पुलीयाखाली, सार्वजनीक रोडवर एक इसम हातात तलवार घेवुन येणाऱ्या जाणाऱ्या इसमांना विनाकारण धाक दाखवुन धुमधाम करीत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद ठिकाणी गेले असता, तेथे एक ईसम पोलीसांना पाहुन हातातील तलवार बाजुला फेकुन पळुन जावु लागला, त्यास सोबत स्टॉफचे मदतीने घेराव टाकुन ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव समीर खान उर्फ येडा समशेर खान, वय ३४ वर्ष, रा. राजीवगांधी नगर झोपडपट्टी, नागपूर असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन एक लोखंडी तलवार किंमती अंदाजे ५००/- रू. ची जप्त करण्यात आली. आरोपीने सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, यांचे शख मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याचे विरुध्द पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ४/२५ भा.ह. का, सहकलम १३५ म.पो.का. अन्यये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.