संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता स्वर्गीय राकेशकुमारजी पोरवाल यांचा स्मृतिदिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोककुमार भाटिया, डायरेक्टर डेव्हलपमेंट एस. पी. एम. हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्चित चांडक, आय. पी. एस, डी. सी. पी. (ईओडब्ल्यू एंड साइबर क्राईम )नागपूर शहर हे उपस्थित राहणार आहे.
ह्या स्मृती दिवसाच्या सोहळ्यासाठी एस.पी.एम. संस्थेचे सचिव विजयकुमार शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. विनय चव्हाण, उपप्राचार्या डॉ.रेणू तिवारी,कार्यक्रमाचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती,तसेच एस.पी.एम. संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित राहणार आहे. स्वर्गीय राकेशकुमारजी पोरवाल यांच्या स्मृती दिवसा निमित्त रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहे.रक्तदानास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी या शिबिरामध्ये रक्तदान करावे . असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. विनय चव्हाण यांनी केले आहे.