क्रेडाई मेट्रोच्या समस्यांसंदर्भात मनपामध्ये बैठक

संदीप जोशी यांच्या उपस्थितीत मनपा, जिल्हाधिकारी, नागपूर मेट्रो रिजनची बैठक

नागपूर :- क्रेडाई नागपूर मेट्रोच्या संदर्भातील विविध समस्यांच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेमध्ये मंगळवारी (ता.९) मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर मेट्रो रिजन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर कार्यालयाचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी तिनही विभागांकडून यावेळी आढावा घेतला. बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती  मनोजकुमार सुर्यवंशी, अति.‍ जिल्हाधिकारी ‍आशा पठाण, सुप्रिया थुल, गौरव अग्रवाल, तेजिंदरसिंग रेणू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रेडाई मेट्रोच्या कार्यक्रमामध्ये नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हाधिकारी व नागपूर मेट्रो रिजन यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांनी प्रस्ताव पाठवावे, अशी सूचना केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या नागपूर कार्यालयाचे मानद सचिव संदीप जोशी यांनी तिनही संस्थांची बैठक घेतली. बैठकीमध्ये क्रेडाई मेट्रोच्या कार्यात येणा-या अडचणींच्या संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाकडे पाठविण्याची निश्चिती करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाठोडा दहन घाटाचे नूतनीकरण करा माजी परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Wed May 10 , 2023
नागपूर :- नेहरूनगर झोनमधील प्रभाग क्र. २६ अंतर्गत वाठोडा दहन घाटाची दयनीय अवस्था असून या दहन घाटाचे नूतनीकरण करा, अशी मागणी मनपाचे माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना केली आहे. वारंवार निवेदन देउन देखील वाठोडा दहन घाटाची स्थिती न सुधारल्याने कुकडे यांनी दहन घाटाचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com