वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई :- आरोग्य, सामाजिक, पत्रकारिता आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अल्फा कम्युनिकेशनतर्फे अल्फा अवॉर्ड 2023 पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सोहळ्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ.राजेंद्र गवई, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ.किशोर मसुरकर, डॉ. विवेक मेंडोसा आदी उपस्थित होते.

आपल्या कारकीर्दीची सुरूवात रत्नागिरीतील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यापासून झाली. कोरोना काळात डॅाकटर, नर्स, वैद्यकीय सेवक यांनी देवदूतांप्रमाणे काम करून देशातील जनतेची सेवा करण्याचे महान काम केले. वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहचवावी असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले.

या वर्षी दिवाळीत इरशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसोबत होतो. डॉ. राजेंद्र गवई यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामास मंत्री सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनन वासा, सायरस गोंदा, फादर फरानसिस स्वामी, उरविजा भातकुली इत्यादींना पुरस्कार देण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे राज्याच्या संस्कृतीची ओळख

Fri Nov 17 , 2023
नवी दिल्ली :- महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. या समृद्ध संस्कृतीची ओळख देशाला व जगाला व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सायंकाळी करण्यात आले. प्रगती मैदान येथे 42 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आयोजित ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!