न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त – न्या. सचिन पाटील

नागपूर :- मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारणाचा एक उत्तम मार्ग असून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले.

नागपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या न्यायाधीश सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधिश डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मध्यस्थी जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. मध्यस्थ प्रशिक्षक अँड .राजेंद्र राठी आणि प्रशिक्षित मध्यस्थी अधिवक्ता ॲड. सुरेखा बोरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.न्यायाधीश पाटील यांनी असेही प्रतिपादन केले की, दिवाणी प्रक्रीया संहीताचे कलम ८९ मध्ये प्रावधानित मध्यस्थी प्रकिया गोपनीय, ऐच्छिक, पारदर्शक, लवचिक व कमी खर्चीक असून न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे मध्यस्थी प्रक्रियेद्वारे निकाली काढता येतात. या प्रक्रीयेद्वारे प्रकरणे निकाली निघाल्यास दोन्ही पक्षांना मैत्रीपुर्व वातावरणात अधिक समाधान देणारा त्वरीत न्याय मिळतो व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतात आणि पैसा, वेळ आणि श्रम यांची बचत होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा न्यायालय नागपूर व तालूका न्यायालयांमध्ये मध्यस्थी केंद्र कार्यरत असून तेथे दाखलपूर्व आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे प्रशिक्षित न्यायिक अधिकारी व अधिवक्ता यांच्या मध्यस्थीने समोपचाराने निकाली काढण्यात येत असून पक्षकारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.

वर्ष २०२१ पासून आजपर्यंत १७४१ प्रलंबित प्रकरणे निकाली

सन २०२१ पासून नागपूर जिल्हयातील न्यायालयांनी मध्यस्थी प्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या प्रलंबित प्रकरणांपैकी १,७४१ प्रकरणे सामोपचाराने मिटल्याची माहीती न्या. सचिन पाटील यांनी दिली.

मध्यस्थी अधिनियम २०२३ आणि मध्यस्थी प्रक्रियेसाठी कोणती प्रकरणे ठेवता येतात याबाबत अँड. राजेंद्र राठी यांनी मार्गदर्शन केले. ॲड. बोरकुटे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची गरज, फायदे, समान न्याय तत्वांबाबत माहिती दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर येथील विधी स्वयंसेवक डॉ. आनंद मांजरखेडे यांनी सुत्रसंचालन केले. मध्यस्थ अधिवक्ता जोगेवार यांनी मध्यस्थी प्रक्रीये बाबतचे त्यांचे अनुभव सांगितले. तसेच मध्यस्थी अधिवक्त्या शुभांगी काळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात पक्षकार, मध्यस्थ अधिवक्ता, अनेक विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात ‘एक मुठ्ठी आसमान’ या नालसा गीताने आणि रोपट्यांना जलार्पण करून करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे व्ही आर मॉल येथे विद्यार्थ्यांना "नशा विरोधी अभियान" अंतर्गत मार्गदर्शन

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पोलीस ठाणे ईमामवाडा ह‌द्दीतील व्ही आर मॉल येथे आयोजीत नशा विरोधी अभियान कार्यक्रमात तेथे उपस्थित असलेले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व जनतेला मादक पदार्थामुळे शरीरावर व समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले, व यासंबंधाने फ्लॅश माँब व हस्ताक्षर अभियानाला सुरुवात करून समाजाला नशामुक्त करण्याची वचनबध्दता व्यक्त केली. पोलीस आयुक्त यांनी सामुदायीक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com