महापौर, आयुक्त, उपमहापौर आणि अधिकाऱ्यांनी केली महाकाली यात्रेची पाहणी

चंद्रपुर –  चैत्र पौर्णिमेनिमित्त चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रा सुरू असून, आज 10 एप्रिल रोजी रामनवमी निमित्त महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे आणि अधिकाऱ्यांनी व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान, महापौरांनी मंदिरात दर्शनासाठी जावून देवीची ओटी भरली.

माता महाकालीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातून आलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्याची पाहणी आज करण्यात आली. महापौर, आयुक्त उपमहापौर यांनी भाविकांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. भोजन, निवास आणि दर्शन रांगेत जावून पाहणी केली. दरम्यान, भाविकांच्या आरोग्यासाठी मनपाच्या वतीने आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या प्रसंगी झोन सभापती खुशबू चौधरी, नगरसेवक सर्वश्री संजय कंचर्लावार, नंदू नगरकर, कल्पना लहामगे, मंगला आखरे, कल्पना बगुलकर, मनपाचे झोन सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रख्यात सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी रामटेक रामायण महानाट्य  कार्यक्रमाची ठरली विशेष आकर्षण

Mon Apr 11 , 2022
प्रख्यात सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीच्या डायलॉगने रामटेक वासी  झाले मंत्रमुग्ध आणि तृप्त।रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामायण महानाट्याला जनतेचा भरभरून प्रतिसाद। रामटेक  –  प्रख्यात सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी रामटेक  सुपर मार्केट येथे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे संकल्पनेतून साकार  रामायण महानाट्य  कार्यक्रमात  उपस्थिती दर्शविली त्यामुळे रामटेक वासियांकरीता विशेष आकर्षण ठरली   कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन ने झाली. प्रख्यात सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या डायलॉग ने रामटेक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!