संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वतःसाठी न जगता बाबासाहेबांना मोठे करण्यासाठी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या महान विभूती मातोश्री रमाई त्यांचा सारखा बलिदान कुणीही करू शकत नाही म्हणून रमाई आंबेडकर ह्या त्याग आणि बलिदानाची मूर्ती आहे.त्यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे विचार समाजातील प्रत्येक महिलांनी अंगीकारावे व जीवन समृद्ध करून घ्यावे असे मौलिक प्रतिपादन समता सैनिक दलाचे मार्शल वीरेंद्र मेश्राम यांनी आज 7 फेब्रुवारीला गौतम नगर तसेच रमानगर येथे आयोजित मातोश्री रमाई जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी मातोश्री रमाई तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी राजेश गजभिये,विकास रंगारी, दिपंकर गणवीर, प्रमोद खोब्रागडे,कोमल लेंढारे, गीतेश सुखदेवें,आशिष मेश्राम, मनोहर गणवीर, सुमित गेडाम, दिनू नागदेवें,मनीष गजभिये, आकाश झोडापे,आदेश,अंकित डोंगरे,मंगेश खांडेकर, अनुभव पाटील,मनीष डोंगरे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात उपरोक्त नमूद मान्यवरांनी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची माहिती समाज बांधवांना दिली.