नागपूर :- श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतिने राष्ट्रसंताचा जन्मदिवस अर्थात ग्रामजंयती महोत्सव साजरा करण्यात आला ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्याने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणार् या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. जन्मजात गुन्हेगारी शिक्का घेऊन जगणार् या बेड्यावरील फासेपारध्यांच्या मुलांना शालेय शिक्षण मिळावे व शिक्षित होऊन सन्मानाने जगता यावे यासाठी प्रश्नचिन्ह शाळेची स्थापना करुन फासेपारधींच्या मुलांना शिक्षीत करीत आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्धल अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणारा राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्कार आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी व उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद रोही यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना आमदार विकास ठाकरे यांनी ग्रामगीता तरुण वर्गापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. असे मत मांडले. अभिजीत वंजारी यांनी सर्वधर्म समभाव वाढवीण्यासाठी महाराजांच्या विचारांचा प्रचार होणे आवश्यक आहे.
वेश्या व्यवसायात ढकललेल्या स्त्रियांच्या पुणर्वसणासाठी विमलाश्रम व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवासी शाळेची स्थापना करुन शिक्षीत करीत असलेल्या रामभाऊ इंगोले यांचा सामाजिक योगदानाबद्धल राष्ट्रसंत जिवन सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. श्रीगुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष अँड.अशोक यावले यांनी शासन दरबारी राष्ट्रसंताच्या विचारांबाबत असलेली उदासीनता दुख:द आहे. अशी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती यांनी राष्ट्रसंताच्या विचारांचे सामाजिक अभिसरण व आचरणा व्हावे यावसाठी कृतिशिल कार्यक्रम आखावा अशी सुचना केली.
कार्यक्रमाचे संचलन प्रा.रामदास टेकाडे यांनी केले. ग्रामजंयती महोत्सवाला विठ्ठल पुनसे, सचिव, अनिल पडोळे, जावेद पाशा, लिना निकम, नाना महाराज, रुपराव वाघ, संगिता जावळे, बाळ पदवाड, सुरेंद्र बुराडे, रामराव चोपडे, देवीदास लाखे उपस्थित होते. आभार सियाराम चावके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंनद माथने, राजु पवार, विठ्टलराव तळवेकर यांनी परिश्रम घेतले.