– आयुक्त डॉ. चौधरी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त मनपा मुख्यालयातील हिरवळीवर मंगळवारी (ता: २६) रोजी संविधान प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संविधान दिनाचे महत्व विशद केले. संविधानातील मूल्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे, याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करत संविधान दिन साजरा केला.
या प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, विजय देशमुख, मनपाचे मुख्य अभियंता लीना उपाध्ये, परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहाय्यक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, श्याम कापसे, घनश्याम पंधरे, प्रमोद वानखेडे, विजय थूल, अशोक गराटे, अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार , कार्यकारी अभियंता अजय डहाके, विजय गुरुबक्षानी, अल्पना पाटणे, विधी अधिकारी प्रकाश बरडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी तसेच मनपातील ज्येष्ठ नागरिक कक्षाचे सदस्य सर्वश्री सुरेश रेवतकर, दत्तात्रय वलकार, प्रदीप सपकाळ, वसंत पाटील यांच्यासह मनपाचे अभिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच संविधानाचे मूल्य प्रत्येक वयोगटा पर्यंत पोहचावे याकरिता मनपाच्या शाळांमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री, हनुमान नगर, नागपूर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक गण, विद्यार्थां व इतर सर्व उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी संविधान प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. मनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये देखील संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.