नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार राज्यातल्या प्रत्येक जिल्हयामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात महाजनसंवाद पदयात्रा शुरू करण्यात आल्या. आज दि. 06.09.2023 रोजी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे, नागपूर दिमाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात तसेच मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी नगरसेवक नितीन साठवणे तसेच शहर उपाध्यक्ष रत्नाकर जयपूरकर, ब्लॉक अध्यक्षत ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश भौनिकर, महासचिव परमेश्वर राऊत, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक राजेश देंगे व हरिश खंडाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जनसंवाद पदयात्रा सुरू झाली.
ही जनसंवाद पदयात्रा आंबेडकर चौकापासून सुरू होऊन हरीश खंडाईत यांचे घर, वालदेताईच्या घरापासून आंबेदकर पुतळयाला माल्यार्पण करून पडोळे निवास मागील गल्ली जनता हॉलच्या मागील लाईन, बाल्या बोरकर यांच्या घरासमोरून, बोलधन यांच्या घराच्या डाव्या बाजूने महापौर नरेश गावंडे यांचे घर, हनुमान चौक, नरेंद्र पाहुणे यांच्या घरापासून पाटीदार भवन मागील गल्ली, यशवंत मेश्राम भीम चौक, सुधा जैन, लोणारे, केशव धावडे यांचे दुकान, नंदनवन झोपडपट्टी, कमल डेकारेशन, श्रीनगर हसन बाग चौक, विजया लक्ष्मी पंडित नगर, डायमंड नगर, श्रीकृष्ण नगर, दर्शन कॉलनीपासून तानाजी वनवे यांच्या घरासमोर पदयात्रा समाप्त झाली.
या जनसंवाद पदयात्रेमध्ये मिलिंद दुपारे, राकेश कनोजे, मुजीब वारसी, अनिल पांडे, नरेश गावंडे अजय जानवे मनोज नौकरकर, मनिष उमरेडकर, पंकज चाफले, सारिका दुपारे, नूतन झोड, प्रशांत पाटील, केशव घावडे, भास्कर चाफले पृथ्वी मोटघरे, अरुण वैद्य, दिपक राकत, योगेश कुंजलकर, मनोज जुम्मानी, मुकेश पौनिकर, शेखर पौनिकर धनराज अतकरी विजय बोरकर, निर्मलाताई बोरकर, वालदे पप्पु चौरसिया, शैलेश कांबळे, बाबु जिनानी, शरिफ दिवान, राजु कुथे, विलास मेश्राम, मुणाल हेडाऊ, रूतिका साफ, अक्षय घोटाळे, ऋषम धुळे, प्रज्वल शनिवारे, अनिल बारापात्रे, संजय मेढे, राजेश रखेजा यशवंत मेश्राम, नितीन रामटेककर, राजेश खानोरकर, नंदा कळंबे, चंदू वनवे, पप्पु पिल्लेवार, राणी अंबादे, तुगलक अंसारी, नारद काटेकर, शुभम मोटघरे, कैलास मेश्राम, नंदलाल पुरणकर, कैलाश वानखेडे, सुनिल उदापुरकर, पिंटू जुनघरे, हर्षल गजभिये, कुनाल चौधरी हे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.