संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी व मिस्त्री म्हणून काम करीत असलेल्या इसमाचा कामावरील भिंत पडल्याने जख्मि होऊन उपचार घेत असलेल्या नागपूर येथील मेयो इस्पितळात आज दुपारी 1 दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतक इसमाचे नाव हरीचंद किसन वाळके वय 60 वर्षे रा कामगार नगर,कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक (मिस्त्री ) हा दैनंदिन कामावर गेले असता बांधकाम केलेली नवनिर्मित भिंत अचानक खाली पडल्याने सदर मृतक जख्मि गंभीर जख्मि झाल्याने उपचारा दरम्यान पाय कापावे लागले होते.उपचारा दरम्यान सदर जख्मि मिस्त्रीचा मेयो रुग्णालयात मृत्यु झाला पोलिसांनी तूर्तास घटनेची नोंद केली असून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून कामठी च्या मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या पाठीमागे पत्नी,दोन मुले व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.