मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

नागपूर,ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी (२० डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या १६ बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात उपद्रव शोध पथकाने ४२३८० नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९५,४९,०००/- चा दंड वसूल केला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

          सोमवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २धंतोली झोन अंतर्गत १ नेहरुनगर झोन अंतर्गत ३गांधीबाग झोन अंतर्गत ४सतरंजीपूरा झोन अंतर्गत १लकडगंज झोन अंतर्गत १ आणि आशीनगर झोन अंतर्गत ४ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३६९१० बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ८४ लक्ष ५५ हजार वसूल करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ

Tue Dec 21 , 2021
 नागपूर, दि. 21 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE  वरुन ऑनलाईन पद्धतीने तसेच पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने भरावयाच्या मुदतवाढीच्या तारखा नियमित शुल्कासह गुरुवार दिनांक 26 डिसेंबर पर्यंत तर विलंब शुल्कासह दिनांक 1 जानेवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com