बाजार निरीक्षक मिलींद मेश्राम सेवानिवृत्त

नागपूर, ता.  : नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन क्र.१० येथे बाजार विभागातील बाजार निरीक्षक पदावर कार्यरत असलेले  ‍मिलींद मेश्राम हे ३१ वर्षाची सेवा पूर्ण करून गुरूवार (दि.३१) रोजी निवृत्त झाले आहे. त्यांनी म.न.पा.च्या विविध विभागात प्रामाणिकपणे कामे सांभाळून आपली सेवा मनपामध्ये दिली. त्यांच्या कामाची पावती म्हणून मनपा उपायुक्त रविन्द्र भेलावे, उपायुक्त  अशोक पाटील. उपायुक्त  विजय हुमने यांनी त्यांचे शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला.

          या सत्कार सोहळयात कर निर्धारक दिनकर उमरेडकर, बाजार अधिक्षक प्रमोद वानखेडे, श्रीकांत वैद्य, संजय बडे, निलेश वाघुळकर, दिलीप जबलपूरे,‍ स्मिता जांभूळकर, दिपक जांभुळकर यांनी पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवून त्यांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Fri Apr 1 , 2022
 मुंबई, दि. 1 :- कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे.  हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com