सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई :- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत देण्यात येणार आहे. या 133 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे. इच्छुकांनी 24 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थीकडून प्रतिमहिना रूपये 450/-, दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून रूपये 100/- शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थी निकष खालीलप्रमाणे आहेत.

1) प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. 2) प्रशिक्षणार्थी 18 ते 35 वयोगटातील असावा. 3) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. 4) ) प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 6) प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्डधारक असावा. 7) प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधीत मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून 8) प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. या प्रशिक्षण सत्राच्या अधिक माहितीसाठी सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो. 9920291237 आणि जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा. असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी काकाचे ऐकून अडाणी मामांना महाराष्ट्र विकू नका

Thu Dec 5 , 2024
– शिवसेना नेते किशोर तिवारी यांची देवाभाऊंना आर्त हाक यवतमाळ :-केन्द्रातील मोदी काकांनी महाराष्ट्र प्रदेश अडाणी मामांना विकण्याचा घाट रचला आहे. मोदी काकांचे ऐकून देवाभाऊ तुम्ही महाराष्ट्र अडाणी मामांना विकू नका अशी आर्त हाक शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी देवाभाऊंना दिली आहे. देवाभाऊ दिनांक 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, त्याअनुषंगाने महाराष्ट्र वाचविण्यासाठी किशोर तिवारी यांनी विनंती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!