लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 मार्चला लाईनमन दिवस

नागपूर :- देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार दि. 4 मार्च रोजी महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मेचोवीस तास सेवादेतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा गौरव करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

राज्यात विविध स्तरावर सोमवार दि. 4 मार्च रोजी होणाऱ्या या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाह्यस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

100 - member Bangladesh Youth Delegation meets Maharashtra Governor

Sat Mar 2 , 2024
Mumbai :-  A 100- member Youth Delegation of Bangladesh visiting India under the International Youth Exchange Programme met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai on Fri (1 Mar). The visit of the Bangladesh Youth Delegation was organised by the Ministry of Youth Affairs and Sports, Government of India with a view to promote friendship, understanding and goodwill among […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com