विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी बांधवांची एकजुट दिसेल – हेमंत पाटील

– मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसींचा पाठिंबा

पुणे :- आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील काही नेत्यांनी इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता या तथाकथित नेत्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केला आहे.पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहिर पाठिंबा दर्शवला. राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत २५ ओबीसी आमदार निवडून आणण्याचा मानस असून या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा समाजाला एक प्रबळ नेतृत्व प्रदान करण्यासाठी ही निवडणूक ‘ओम’ (ओबीसी-मराठा) बांधव एकजुटीने आणि एक दिलाने लढणार असल्याचे पाटील म्हणाले.

निवडून आलेले ओबीसी आमदार पुढे मंत्री झाले तर समाजाच्या विविध मागण्यांचा प्राधान्याने विचार होण्यास मदत होईल, असे देखील पाटील म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर पुण्यात तीव्र आंदोलन करू असा इशाराच यानिमित्ताने पाटील यांनी दिला आहे.

‘ओबीसी-मराठा भाई भाई’ अशी घोषणा देत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरावली सराटी येथे जावून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली.राज्यभरात मराठा आंदोलन केले जात आहे. पंरतु, काही समाजकंटकांनी ओबीसी बांधवांची दिशाभूल करीत त्यांना मराठ्यांविरोधात उभे करण्याचे काम केले. आता एकत्र विधानसभा निवडणूक लढून मनभेद दूर करण्याचे काम केले जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ओबीसी बांधवांना महाराष्ट्रात जवळपास २५ जागा द्याव्यात, अशी मागणी जरांगे पाटील यांच्याकडे करणार असल्याचे पाटील पुढे बोलतांना म्हणाले.पत्रकार परिषदेते ओबीसी नेते राजेंद्र वणारसे ,जरांगे पाटील यांचे सहकारी आणि वकील अँड.गणेश म्हस्के यांच्यासह अँड.वाजहेद खान, संदीप कांबिलकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार-वणारसे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, ओबीसी-मराठा बांधव एकत्रित येणार असल्याने तथाकथितांचे धाबे दणाणले आहेत. यंदाची निवडणूक त्यामुळे निर्णायक ठरणार असल्याचा दावा ओबीसी नेते वणारसे यांनी केला. राज्यातील प्रत्येक बुथवर मराठा-ओबीसी बांधवांना एकत्रित करीत आरक्षणासह इतर मुद्द्यांवर त्यांचे प्रबोधन करण्याचा मानस असल्याचे देखील वणारसे म्हणाले.

पाटील यांनी कराड (उत्तर) मधून निवडणूक लढवावी-ऍड.म्हस्के

ओबीसी आणि मराठा बांधवांनी एकत्रित येवून समाजात फुट पाडणार्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली तरच आगामी काळात जातीय तेढ निर्माण करण्याची हिमंत कुणाची होणार नाही, असे आवाहन पत्रकार परिषदेतून ऍड.गणेश म्हस्के पाटील यांनी केले.ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील कराड (उत्तर) मधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची विनंती यानिमित्ताने त्यांनी केली. यासंदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेमंत पाटील यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा करीत ओबीसी बांधवांना एकत्रित करण्याचे आवाहन देखील म्हस्के यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथे जीवशास्त्र मंडळाची स्थापना 

Thu Sep 26 , 2024
नागपूर :- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला नेहमीच प्राधान्य देत आले आहे. विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा व त्यांना शिक्षणाचा आनंद लुटता यावा म्हणून १८ सप्टेंबरला महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यी मंडळाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांचा शपथविधीचा कार्यक्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com