कोंढाळी :- मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे (काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे यांनी सांगितले.
काटोल पंचायत समितीच्या खुर्सापार केंद्रांतर्गत येणार्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनापानी येथे आयोजित केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजनाचे उद्घाटन प्रसंगी उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन केले.
१३ डिसेंम्बर चे सकाळी १०-००वाजता जुनापानी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश वाढवे यांचे अध्यक्षतेखाली, काटोल पंचायत समिती चे उप सभापती निशिकांत नागमोते,नागपूर जिल्हा परिषद चे कोंढाळी जि प सदस्या पुष्पा चाफले,काटोल पंचायत समिती सदस्य अरुण उईके, लता धारपुरे, यांचे विशेष उपस्थितीत व ग्राम पंचायत जुनापानी चे सरपंच किस्मत चौहान,उप सरपंच उत्तमराव काळे, प्रमोद चाफले, गुणवंत खवसे, दुर्गा प्रसाद पांडे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत क्रीडा ध्वजारोहण करून चंदनपारडी ते जुनापानी आणलेली क्रीडा ज्योत ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन संपन्न झाले.
केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्रसंगी मैदानी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.याप्रसंगी केंद्र स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रीडापटू व सांस्कृतिक महोत्सवात उत्कृष्ट प्रदर्शन करानारे विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला.
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक शाळा ते महाविद्यालयीन शिक्षण प्रसंगी खेळाला महत्त्व दिले गेल पाहिजे.असे मत पंचायत समिती सदस्या लता धारपुरे यांनी व्यक्त केले.
खेळाला महत्त्व देण्यासाठी राष्ट्रकुल आणि खेलो इंडिया ते केंद्र स्तरिय स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसाठी ग्राम पंचायत, पंचायत समिती तसेच ते जिल्हा परिषदे क्रीडा संचनालय यांचे कडून बक्षिसासाठी भरघोस निधी वाढविण्यासाठी जनप्रतिनिधी आप आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव करून तो निधी मंजूर करून घेतला पाहिजे.असे मत सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसाद पांडे यांनी मांडले.
अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा…
स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो. जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो असे जि प सदस्य पुष्पा चाफले यांनी सांगितले.
खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूवृत्ती विकसित होते. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते. त्यामुळेच खेळांचे महत्त्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे असे उप सभापती निशिकांत नागमोते-यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्या प्रमाणे दर वर्षी खासदार चषक भरवतात त्या प्रमाणे सरपंच/सभापती, जि प सदस्य (अध्यक्ष) व आमदार चषक भरविण्यात यावे असे मत ज्येष्ठ नागरिक दुर्गा प्रसाद पांडे यांनी मांडले.
काटोल पंचायत समिती सदस्य अरुण उईके,जुनापानी येथील सरपंच किस्मतराव चव्हाण,उपसरपंच उत्तमराव काळे, कोंढाळी ग्राम पंचायत माजी सदस्य प्रमोद चाफले, केंद्र प्रमुख वाढवे यांनी ही मार्गदर्शन केले.
क्रीडा स्पर्धेमध्ये लंगडी खोखो कबड्डी रिले रेस 200 मीटर दौंड दौंड कुस्ती या खेळांचा सांघिक नृत्य समूहगीत वैयक्तिक गीत गायन वक्तृत्व एकांकिका या खेळाचा समावेश होता वरिष्ठ कबड्डी विजयी शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनापाणी कनिष्ठ कबड्डी विजयी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुरसापार सांघिक नृत्य वरिष्ठ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनापाणी कनिष्ठ नृत्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदन पार्टी रीले रेस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सापार उंच ऊडी कुणाल पाढे जुनापाणी 200 मीटर कुणाल पाठे जुनापाणी कार्यक्रमाचे यशस्वी ते करीता चंदन पाडी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश राठोड शाळेतील सहायक शिक्षिका सुनीता झाडे अर्चना मोटे विद्धेश्वर सोमकुवर परडबाजणे प्रमोद शिंगणापुरे आदेश शिक्षकांचे सहकार्य लाभले
या प्रसंगीकेंद्र शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मडके,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरेखा डोंगरे सदस्य साहेबराव कडवे सविता बारंगे माधुरी पाठे अर्चना गाडरे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता टोपले केंद्रप्रमुख रमेश गाढवे मुख्याध्यापक प्रमोद बोडखे उपस्थित होते. संचालन सुनंदा जामदार प्रास्ताविक केंद्रप्रमुख रमेश गाढवे आभार मुख्याध्यापक प्रमोद बोडखे यांनी मानले