संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर पालिकेचा कार्यकाळ जानेवारी 2022 मध्ये संपला असून तेव्हापासून नगर पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे.पण नगरपालिकेची निवडणूक झाली नाही .नगरपालिआ निवडणुका बाबतचे प्रकरण बऱ्याच दिवसापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूक होत नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ दिसतात.तर माजी नगरसेवक इच्छुकांचे लाखो रुपये खर्च होत आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये कामठी नगर परिषद निवडणुका होणे अपेक्षित होते परंतु नोव्हेंबर 2023 लागला असूनही निवडणुका झाल्या नाहीत व यावर्षी होण्याची शक्यताही नाही परंतु नोव्हेंबर 2021 मध्ये निवडणुका होतील त्यामुळे जानेवारी 2020 पासून इच्छुक उमेदवारांनी कार्यक्रमाचा धडाका लावला.मागील अडीच वर्षांपासून सातत्याने प्रभागमधील मतदार व कार्यकर्त्यांसाठी खर्च करावा लागत आहे.आर्थिक क्षमता संपलेले अनेक हंगामी समाजसेवक सध्यस्थीतीमध्ये गायब झाले आहेत.स्पर्धेत टिकून आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रभागातील अडी अडचणीसाठी स्वता खर्च करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीत निवडणुका लांबणीवर पडल्याने अनेक हंगामी समाजसेवक गायब झाले आहेत
कार्यकर्ते, मतदार खुश ठेवण्यासाठी तारेवरची कसरत होत आहे.निवडणूक लवकर व्हावी यासाठी माजी नगरसेवकांनी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. पण निवडणूक जाहीर होत नाही .कधी एकदाची निवडणूक होईल अशी सर्वाची भावना झाली आहे.पण इच्छुकांची खरी पंचायत नागरिकांना दिलेल्या आश्वासनाना पूर्ण करताना होत आहे .दोन वर्षापासुन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने इच्छुक उमेदवारांनी आता आश्वासनांची मालिका बंद केली आहे.त्यामुळे इच्छुकांच्या आश्वासनाच्या मालिका थंडावल्या आहेत.