शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन सादर

– सलंग्न करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांना मूळ ठिकाणी पाठवा ..

नागपूर :- नवनियुक्त पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नुकतंच पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी यांना मूळ ठिकाणी पाठविणबाबत नुकताच जी आर प्रसिद्ध केलेला आहे परंतु आत्तापर्यंत CP, SP यांनी पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्या आदेशाच पालन केलेले नाही आत्तापर्यंत कुठलाही अहवाल दिलेला नाही नियम नसताना सुद्धा आत्तापर्यंत पोलीस खात्यामध्ये ठाणेदार यांचा आर्थिक कारभार बघणारे, आदेशाचे पालन करणारे अधिकारी, पोलीस अंमलदार कित्येक वर्षापासून एकाच ठाण्यामध्ये अटॅच केलेले आहेत, काटोल येथील पोलीस निरीक्षक यांनी सुड बुद्धीने महिला अंमलदार हिला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पोलीस मुख्यालय येथे अटॅच केले परंतु पोलीस महासंचालक यांचे आदेश येऊन सुद्धा आत्तापर्यंत पोलीस अंमलदारांना मूळ ठिकाणी पाठवण्यात आलेले नाही. जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर, गोंदिया शिवसेना पदाधिकारी दीप्ती मिश्रा यांनी पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेऊन अटॅच केलेले अधिकारी अंमलदार यांना मूळ ठिकाणी पाठविणबाबत विनंती केली. पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया अपवादत्मक परिस्थितीमध्ये प्रशासकीय निकड समजून घटक स्तरावरील व परिक्षेत्रीय स्तरावरील आस्थापना मंडळ यांनी वार्षिक सार्वत्रिक बदली प्रक्रिया पार पाडल्यानंतर बदली पात्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्वरित विहित मुदतीत बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे त्यासंबंधीचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना यांनी नुकतीच cp/sp वरिष्ठ पर्यवेशीय अधिकारी, Range IGP यांना दिलेले आहेत. परंतु आत्तापर्यंत कुठलीही कारवाई या संबंधित विषयावर केलेली नाही, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बदली झाल्यानंतर इतर ठिकाणी Attach करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नाही तरीसुद्धा पोलीस अधिकारी आपल्या आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरता मर्जीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना अनेक वर्षे Attach करून कामे करून घेतात काही पोलीस अधिकारी पोलीस महिला अंमलदारावर द्वेष भावनेतून इतर ठिकाणी Attach करतात हे चुकीचे आहेत. कुठलाही कायदा नसताना व प्रशासकीय तरतूद नसताना सुद्धा अटॅचड प्रणाली मुळे अनेक अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास पोलीस खात्यामध्ये होत आहे. वंदना वासुदेव खेडकर बक्कल नंबर 1846 पोलीस स्टेशन काटोल यांना सुद्धा पोलीस मुख्यालय येथे गेल्या सहा महिन्यापासून Attach करण्यात आले त्या संबंधितचे पत्र सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पावसाळी अधिवेशनात दिलेले आहेत. वरिष्ठांचे आदेश येऊन सुद्धा आत्तापर्यंत वंदना वासुदेव खेडकर बक्कल नंबर 1846 यांना पोलीस मुख्यालय येथून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तसेच त्यांना त्वरित मूळ बदली ठिकाणी हजर सुद्धा करण्यात आलेले नाही, आपण या विषयाची सखोल चौकशी करून ताबडतोब कारवाई निवेदना मार्फत करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“मुख्यमंत्री वयोश्री योजना” कार्यशाळेला आशा सेविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Fri Aug 9 , 2024
– मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आशा सेविकांना दिली योजनेची इत्थंभूत माहिती नागपूर :- नागपूर महानगरपालिका व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता: ८) “मुख्यमंत्री वयोश्री योजना” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला आशा सेविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आशा सेविकांना “मुख्यमंत्री वयोश्री योजनेची इत्थंभूत माहिती देण्यात आली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com