नागपूर :- बहुजन समाज पार्टी ने गाव चलो, घर चलो, बुथ बनाओ अभियान सुरू केले असून त्या अभियानांतर्गत भाजपचे आमदार मोहन मते यांच्या निकट असलेले कार्यकर्ते सचिन थाटे यांच्या नेतृत्वात पन्नासावर कार्यकर्ते बहुजन समाज पार्टीत सामील झाले. बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एड सुनील डोंगरे व प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने यांनी त्यांचे रवीभवन येथे स्वागत केले.
बहुजन समाज पार्टी चे गाव चलो, घर चलो, बूथ बनाओ अभिमान सुरू झाले असून, त्याच अंतर्गत पूर्व नागपुरातील विधानसभा अध्यक्ष धर्मपाल गोंगले, मुकेश मेश्राम, सचिन मानवटकर, संजय इखार, प्रवीण खांडेकर आदींच्या माध्यमातून बुथ स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे कार्य सुरू आहे.
या अभियानांतर्गत भाजपचे युवा कार्यकर्ते सचिन थाटे यांच्या नेतृत्वात विशाल गणवीर, मिलिंद वारके, प्रवीण फुले, अनिकेत दातीर, हिमांशु कुर्वे, आशिष थाटे, साहिल पठाण, रितेश कुरोरे, रजत रोकडे, विलास बनकर, राजा शेख, सलीम शेख, सतीश पराते, निखिल चौधरी, अतुल नागपुरे, शाहरुख शेख, सनी शिंदेपाटील, विजय नंदेश्वर आदि प्रमुख कार्यकर्त्यांसह पन्नासावर कार्यकर्त्यांनी बसपात जाहीररीत्या प्रवेश घेतला.
बसपा ने त्यांना बहन व हत्तीची प्रतिमा असलेला दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले व सर्वांना पक्षाचे प्राथमिक सदस्य बनविले.