नागपूर :- डागा शासकीय रुग्णालय येथे सिकलसेल, हिमोफिलिया तसेच थैलेसिमिया रुग्णांकरिता वैद्यकीय अधीक्षिक डॉ. सीमा पारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोधैर्य उपक्रमास 19 जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली.
रुग्णालयाच्या हिमोफिलिया डे केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक समस्या समजून घेण्याकरिता मनसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांच्याद्वारे रुग्ण, डॉक्टर यांच्यामध्ये समूह चर्चेद्वारे रुग्णांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच रुग्ण व त्यांच्या पाल्यांकरिता विपश्यना, ध्यान साधनेचे सत्र आयोजित करण्यात आले.
बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी. समुपदेशक संजीवनी सातपुते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचिती वाळके व हिमाटोलोजी समन्व्यक संदीप पोरटकर, समुपदेशक लीना गजभिये व इतर कर्मचाऱ्यांद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.