यवतमाळ :- जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरभरा पिकावरील मर रोग व स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत उपाययोजना सूचविण्यात आल्या असून त्याप्रमाणे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हरभरा पिकावरील मर रोगाच्या व्यवस्थापनाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळून प्रति एकरी समप्रमाणात टाकावे. हरभऱ्यावरील स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (१ x 109 पीओबी प्रति मिली) ५०० एलई प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ६.६ मिली किंवा लॅम्बडा सायहालोथ्रीन ५ टक्के इसी ८ मिली किंवा फ्युबेन्डामाइड ८.३३ टक्के + डेल्टामेथ्रीन ५.५६ टक्के एससी ५ मिली किंवा नोवालुरोन ५.२५ टक्के अधिक इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एससी १६.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.