संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन रहिवासी फिर्यादी जितेंद्र पाटील नामक इसमाने मोबाईल असलेली एक ऑनलाईन एप डाऊनलोड करून एका टास्क कंपनीशी ऑनलाईन आर्थिक व्यवहार केला.या आर्थिक व्यवहाराची सुरुवात 10 हजार रुपयाने केले असता त्याला अधिकचे 1500 रुपये अधिकचा परतावा झाला यासारखे अधिक परतावा मिळण्याचे आमिशातून लाखो रुपयांची गुंतवणूक केली मात्र त्यानंतर कुठलाही परतावा मिळाला नाही ज्यामध्ये लालसेपोटी 43 लक्ष 83 हजार रूपयाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच यांदर्भात फिर्यादी जितेंद्र पाटील वय 45 वर्षे रा न्यू खलाशी लाईन कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सूरु आहे.