संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजार जवळ नागपूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने पायी जाणाऱ्या इसमास धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात इसमाचा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून मृतकाचे नाव नो इस्माईल शेख वय 36 वर्षे रा चित्तरंजन दास नगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शविच्छेदन करून दफनविधी करण्यात आले.तर या घटनेतील आरोपी ट्रॅव्हल्स चालक फैयाज खान वय 52 वर्षे रा शिवणी विरुद्ध भादवी कलम 279,304(अ) सहकलम 134/177मोटर वाहन कायदा अंनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.