लिहिगाव च्या मालू राईस मिल ला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील मालू राईस मिलला शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याची घटना दुपारी 12 दरम्यान घडली मात्र वेळीच पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन वाहन पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.सुदैवाने जीवितहानी टळली.

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव येथे मालू मिलच्या दुसऱ्या माळ्यापर्यंत मशीनचे ब्रान सेक्शन असून तेथून धानाचे कव्हर पास होते. दैनंदिन रित्या काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाल्याने अचानक आग लागली.घटना घडताच मिलचे मालक बनवारीलाल मालू यांनी त्वरित पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांना माहिती देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून अग्निश्मन वाहनांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश गाठले.हा सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमरावती जिल्ह्यातील अटल भूजल योजनेच्या कामांची चौकशी करा - अमोल गोहाड

Fri Jun 14 , 2024
मोर्शी :- अमरावती जिल्ह्यात ड्राय झोन मध्ये असलेल्या वरूड मोर्शी चांदूरबाजार तालुक्यातील जल संधारणाची कामे मोठ्या प्रमाणत करणे गरजेचे असताना या संपूर्ण कामांकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून सुरु आलेली संपूर्ण कामे केली निकृष्ट दर्जाची होत असल्याने ड्राय झोन मुक्तीसाठी होत असलेल्या या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com