नागपूर :- वीज ग्राहकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करून ग्राहक सेवा गतिमान करण्यासोबतच महावितरणला अधिक लोकाभिमुख करण्याचे आव्हान महावितरणच्या नागपूर परीमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले.
श्रीकृष्ण नगर परिसरातील वीज ग्राहकांना जलद सेवा मिळावी यासाठी महावितरणच्या नंदनवन उपविभागा अंतर्गत असलेले श्रीकृष्ण नगर शाखेचे कार्यालय उमरेड रोड येथून निर्मल नगरी येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन नागपूर परिमांडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
श्रीकृष्ण नगर परिसरातील वीज ग्राहकांना अधिक सोयीस्कर असलेल्या या नवीन कार्यालयामुळे ग्राहक सेवा देखील गतिमान होणार असल्याचा विश्वास नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, साहाय्यक कार्यकारी अभियंता धीरज बारापात्रे यांचेसह नंदनवन उपविभागातील अधिकारी, अभियंते वा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर