महागाई मुक्त भारत करावे- काँग्रेस नेत्या ॲड. नंदा पराते

नागपुर – बीजेपीच्या मोदी सरकारने पेट्रोल , डिझेल व गॅस सिलेंडरची भाववाढ करून जनतेची कमर तोडली आणि देशात भाववाढमुळे महागाईचा राक्षस जनतेची छातीवर बसविले. बीजेपी सरकार जिवनावश्यक वस्तूंचे भाववाढ करून जनतेचे जगणे नामोहरण करून ठेवले आहे म्हणून पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात आंदोलन भारतभर होत आहे.बीजेपीची महागाई विरोधात महागाई मुक्त भारत करावे असे आव्हान करीत काँग्रेस पक्षाने जनतेचा हितासाठी भर उन्हात आंदोलन करण्यास रस्त्यावर उतरली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आंदोलनाची  सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेश व शहर पदाधिकारीसह शकडो कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी केली. करेंगे, करेंगे महागाई मुक्त भारत करेंगे, मोदी सरकार मुर्दाबाद, बीजेपी तेरी महागाई नही चलेंगी, होश मे आयो, होश मे आयो , महागाई कम करो. महंगाई की मार महिलांओ पर वार, पेट्रोल डिझेल शंभरावर , मोदी बस्स करा जनतेची लूटमार, जीवनावश्यक वस्तू के दाम कम करो, भाजप हटाव देश बचाव,वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल,जारी है महंगाई की मार हाय हाय भाजपा सरकार,मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद,सिलेंडर महंगा महंगा तेल वारे मोदी तेरा खेल! या गगनभेदी नारे देत निर्दशने केलेत. या चौकात दुचाकी वाहन,मोटरसायकल या वाहनांची पुजा करून हार टाकून बीजेपी सरकारचा भाववाढीचे निषेध करण्यात आला.
बीजेपी सरकारच्या भाववाढ व महागाई विरोधात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस काँग्रेस नेत्या ॲड. नंदा पराते, माजी उपमहापौर अण्णा राऊत, काँग्रेस ब्लाक अध्यक्ष रजत देशमुख,मनोज घोडमारे,गंगाधर बांधेकर,शुभम शेंडे, अभिषेक मोहाडीकर , अभिजीत ठाकरे,बाबुलाल शाहू,सुकेश निमजे,सुरेशसिंह चव्हाण,प्रविण शेंडे, प्रशांत बुरडे,नरेंद्र नागभिडकर,महेश वर्मा,राकेश वैद्य ,दिपक बोरकर, पवन चौधरी, राजा मिश्राा,संजना देशमुख,वर्षा गुजर, छाया सुखदेवे, संगिता उपरीकर,पद्मा तिवारी, कविता नितनवरे,माया धार्मिक,कुंदा निनावे,मंदा सोनकुसरे,गिता बंडोले,मंजू पराते,कल्पना अड्याळकर, मंदा शेंडे, शकुंतला वठ्ठीघरे, गिता हेडाऊ सह  शेकडों काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी बीजेपी सरकारचा निषेध केला.
बीजेपीच्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ केल्याने जिवनावश्यक वस्तूंचे भाव झपाट्याने वाढत आहे म्हणून आता जनतेने महागाई मुक्त भारत करावे असे आव्हान काँग्रेस नेत्या ॲड. नंदा पराते यांनी केले.  काँग्रेसच्या महागाई व भाववाढ विरोधी सप्ताहा निमित्ताने या आंदोलनात नागरिकांचा मोठा सहभाग होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिक्षिका लता वंजारी यांना निरोप

Mon Apr 4 , 2022
संदीप कांबळे,कामठी निवृत्तीनंतरही सत्र संपेपर्यंत निशुल्क सेवा देण्याचा निर्धार. कन्हान : – पं.स.पारशिवनी अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा, निलज येथील शिक्षिका सौ.लता मंगल वंजारी यांचा सेवानिवृत्ती निमीत्य सेवापूर्ती सोहळा नुकताच निलज येथे पार पडला. कार्यक्रमाला रामटेक लोकस भेचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, जि प गोंडे गाव-साटक सर्कलचे सदस्य व्यंकटराव कारेमोरे, ग्राम पंचायत सरपंचा आशाताई पाहुणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com