११ वी विज्ञान शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या शालेय शिक्षण विभागाच्या अध्यादेशामुळे बहुसंख्य विद्यार्थी विज्ञान शाखेच्या प्रवेशापासून वंचित असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासन, प्रशासनाने परिसरातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वाढीव संख्या मंजूर करून तातडीने प्रवेशाचा प्रश्न सोडवावा,अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहे.

शालेय सत्र संपत आले आहे. बहुसंख्य विद्यार्थी विज्ञान शाखेच्या प्रवेशापासून वंचित आहे, परिसरातील शाळा व महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालक,विद्यार्थी व सामाजिक संघटना शिक्षण उपसंचालक व संचालक कार्यालयात वारंवार जात असून देखील शिक्षण विभाग उदासीन आहे. शिक्षण विभागाच्या उदासिनतेुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होणार आहे.

कामठी शहरातील सेठ केसरिमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी सायन्सच्या दोनही तुकड्या फुल्ल झाल्या आहेत. अजूनही शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला संबंधित वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात तातडीने आदेश पारीत करावेत अशी मागणी होत आहे.

कामठी शहरातील सेठ केसारीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय ही जुनी व गुणात्मक दर्जाची शालेय शिक्षण संस्था असल्याने शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी येथे मोठा लोंढा वळत असतो. यंदाही या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी सायन्सच्या प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी वर्गाची कमालीची झुंबड उडाली असून या कनिष्ठ महाविद्यालयातील दोन तुकड्यांमधील व एक विनाअनुदानित ३६० विद्यार्थी क्षमतेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र गुणवत्ता प्राप्त अजून शेकडो विद्यार्थी अद्याप वंचित असून शालेय प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये या शासन अध्यादेशानुसार प्रवेश नाकारला आहे.या महाविद्याला प्रत्येक तुकडी साठी प्रति वर्षी २०-२० वाढीव संख्या मिळत असते,मात्र यावर्षी शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी अजून पर्यंत वाढीव प्रवेश वाढवून न दिल्याने अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेच्या प्रवेशापासून वंचित आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडवावा,अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहे

शासन अध्यादेशानुसार शहर व परिसरातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत तातडीने आदेश पारीत करावा अशी मागणी वंचित विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रवेशाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे. पालक व सामाजिक तथा राजकीय संघटनांकडून प्रवेश मिळवण्यासाठी अनेक निवेदनांद्वारे मागणी होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

Tue Oct 18 , 2022
मुंबई :- येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com