यवतमाळ :- महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची महीला वर्गात प्रचंड क्रेज पाहावयास मिळत आहे. जागोजागी महीलांसह नागरीकांची ताईंसोबत सेल्फी काढण्याची लगबग राजश्री पाटील यांची वाढती लोकप्रियता दर्शविनारी आहे. राजश्री पाटील यांनी सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ताईंनी बचत गटाच्या ५० हजार महीलांना पतपुरवठा करीत स्वयंभु बनविले आहे. ह्या महीला महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांसाठी आपल्या निकटवर्तीयांना संपर्क साधुन प्रचार करीत आहेत.
यवतमाळ – वाशिम मतदार संघाला यावेळी मिळालेल्या नव्या चेहऱ्याची सर्वत्र चर्चा आहे. राजश्री पाटील यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीचे महीला वर्गावर गारुड आहे. राजश्री पाटील चेअरमन असलेल्या गोदावरी मल्टीस्टेटने पाच राज्यात आपला डोलारा विस्तारला आहे. सहकार क्षेत्रात ताईंचे नाव फार आदराने घेतल्या जाते. राजश्रीताईंच्या कामाची दखल निती आयोगाने देखील घेतली आहे. निती आयोगाने देशभरातुन निवडलेल्या दहा प्रभावशाली महीलांपैकी राजश्री पाटील एक आहेत.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी महीला सक्षमीकरणासाठी वित्तीय क्षेत्राचा पुरेपुर वापर केला. महीला बचत गटांच्या बैठका घेवून त्यांना रोजगाराच्या वाटा समजावुन सांगीतल्या. महिलांना लघू उद्योग आणि तत्सम उद्योगांसाठी प्रोत्साहीत केले. ज्यामुळे तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त महीलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यातील बहुतांश महीला विदर्भ मराठवाड्याच्या सिमावर्ती भागातील आहेत. राजश्री पाटील यवतमाळ – वाशिम मतदार संघातुन निवडणुक लढवित असल्याचे कळताच हजारो महीला यवतमाळ – वाशिम मतदारसंघातील आपापल्या नातेवाईकांना आणि ओळखीतील मतदारांना संपर्क साधुन राजश्री पाटील यांना मत देण्याचे आवाहन करीत आहेत. प्रचारासाठी गावोगावी गेल्यानंतर महीलामंडळात ताईंसोबत सेल्फी घेण्याची क्रेझ पहावयास मिळत आहे. राजश्री ताई पाटील यांची वक्तुत्वशैली वाखानण्यासारखी आहे. त्यांचा अभ्यास अफाट आहे. राजश्री पाटील यांच्या माध्यमातुन मतदारसंघाला उच्च विद्या विभुषित उमेदवार मिळाल्याने मतदारांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.