रामटेक-लातूर लोकसभेची जागा ‘पीरिपा’ला द्या
राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंची आग्रही मागणी
मुंबई/नागपुर :- पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार आहे. उत्तरप्रदेशानंतर सर्वात जास्त जागा असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागां हे महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. राज्यात शिवसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात घटक पक्षांसोबत मिळून राज्याची निवडणूक पार पडणार आहे. राज्यातील मित्र पक्षातील एक भाग आहे. परंतु, जागा वाटपात महायुतीकडून त्याप्रमाणे वाटा देण्याचे काम होत नाही. घटक पक्ष हा संपूर्णपणे महायुतीसोबत आतापर्यंत काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना पुन्हा सत्तेची चावी मिळवून द्यायची आहे त्याकरिता राज्यातील मित्र पक्षांना विश्वासात घेण्याची गरज आहे. परंतु, लोकसभा जागा वाटपात ‘महायुती’कडून घटक पक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. आगामी निवडणूकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मोठा संख्येने मतदार हा रामटेक व लातूर लोकसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे रामटेक-लातूरची जागा पीरिपासाठी महायुतीने द्यावी अशी आग्रही मागणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडेंनी सांगितले की, देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाही टिकविण्याचे काम आज पंतप्रधान मोदी करीत आहे. मोदी परिवराच्या सदस्य बनूनच आज त्यांच्या सोबत देशातील विविध राज्यातील घटकपक्ष काम करीत आहे. तसेच या घटक पक्षाच्या मदतीनेच मोदीजींचे स्वप्न 400 पार करण्यास सज्ज झाले आहे. परंतु, राज्यातील मित्रपक्षांना महायुतीकडून लोकसभा निवडणूकांना डावलत असल्यासारखे होत असताना दिसत आहे. राज्यात मित्र पक्षांना पण मोदींच्या या 400 लोकसभेच्या जागा मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याची संधी द्यावी, असेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
राज्यात एकीकडे जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडून होत आहे. अश्या पद्धतीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर महायुती सरकार व घटक पक्षांकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्यामुळेच आज राज्यात जातीय तेढ निर्माण होत नाही आहे. महाराष्ट्रात महापुरुष व संताच्या भूमिला बदनाम करणाऱ्यांना त्यांची जागा मतदार हा दाखविणाराच. परंतु, मित्रपक्षांना लोकसभा निवडणूकीत समावून घेण्याचे काम आज महायुतीकडून होतांना दिसून येत नसल्याची खंतही कवाडे यांनी व्यक्त केली. राज्यात बहुजन व वंचितांच्या प्रामाणिक मतदारांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी वर विश्वास आहे. गेल्या अनेक निवडणूकांमध्ये रामटेक आणि लातुरच्या मतदारांनी पीरिपा वेळोवेळी विश्वास ठेवला आहे. त्यांच्या सन्मानार्थ दोन्ही जागा महायुतीने पीरिपासाठी राखीव करून देण्याची आग्रही मागणी जयदीप कवाडे यांनी केली.