ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

– ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा

मुंबई :- महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना लकी ड्रा व्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रामध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. वीज बिलाची किमान रक्कम रु. १००/- असणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम रु.१०/- पेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हि घ्या फडणवीसांच्या कार्यालयातली गुपिते आणि गौप्यस्फोट 

Wed Dec 18 , 2024
ज्यांचा राज्यातल्या राजकारणाशी सत्तेशी सततचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दरक्षणी संबंध येतो त्यांना आता तातडीने स्वतःमधे काही बदल करवून घ्यावे लागतील अन्यथा महाराष्ट्र हे राष्ट्रातले जगातले सर्वाधिक भ्रष्ट राज्य प्रांत म्हणून ओळखल्या जाईल एवढा धुडगूस सत्तेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित ज्याने त्याने घातला आहे मात्र त्याचवेळी एकमेव आशेचा किरण राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी हा सत्तेतलाधुडगूस भ्रष्टाचार बेधुंद कारभार खपवून न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!