महात्मे ई-क्लिनिक -TELEMEDICINE CENTRE चा शुभारंभ

नागपुर – हॉस्पीटल पर्यंत पोहचू न शकणाऱ्या दूरस्थ गरजू रुग्णांसाठी खास सोय म्हणून MECL आणि एस.एम.एम. आय वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित महात्मे आय बँक आय हॉस्पिटल च्या संयुक्त उपक्रमातून महात्मे आय बँक आय हॉस्पिटल, राजीवनगर, सोमलवाडा, नागपूर येथे ई- clinic चे उदघाटन झाले. कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष श्री नितिनजी गडकरी, माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग; भारत सरकार, यांनी या उपक्रमाचे भरपूर कौतुक केले.

प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रल्हादजी जोशी, माननीय मंत्री, संसदीय कार्य तथा कोळसा व खाण मंत्रालय आणि श्री. रावसाहेब दानवे पाटील, माननीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा व खाण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली वर्चुअल रूपात उपस्थित होते. श्री दयाशंकरजी तिवारी, माननीय महापौर, नागपूर महानगरपालिका, नागपूर आणि श्री रणजीत रथ – अध्यक्ष एवं प्रबंधक निदेशक, मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड, नागपूर – ज्यांच्या CSR सहकार्यातून हे शक्य झाले – यांची विशेष उपस्थित होती.

माननीय खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कि, तसे पाहिले तर टेलिमेडिसिनचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. एस. एम. एम. आय वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित महात्मे आय बँक आय हॉस्पिटल अनेक वर्षांपासून नेत्रचिकित्सेकरिता टेलिमेडिसिनचा वापर करत आले आहे. पण टेलिमेडिसिनला नवी ओळख मिळाली, ती कोविड काळात. दूरस्थ रुग्ण कोणत्याही संपर्काशिवायही टेलिमेडिसीनद्वारे उपचार घेऊ शकतात हा विश्वास कोविडने आपल्याला दिला. नुकतेच, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मनसुखभाई मांडविया जी यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत टेलिमेडिसिनला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी असंसर्गजन्य आजारांसाठी टेलीमेडिसिन खूप प्रभावी ठरेल. आपत्कालीन परिस्थितीत किंवा कोविडमध्ये तर हे फारच फायदेशीर आहे. हे लक्षात घेऊन, MECL ने महात्मे आय बँक आय हॉस्पिटलसोबत टेलिमेडिसिनचा हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याबद्दल आदरणीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हादजी जोशी आणि रावसाहेब दानवे जी यांचे मनःपूर्वक आभार.

सध्याच्या या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात, आदिवासी भागात किंवा जेथे रुग्ण असेल तेथे त्याचे बीपी, शुगर, पल्स ऑक्सिमीटरने तपासणी, डोळ्यांची तपासणी, रेटिनाची तपासणी (डायबेटिक रेटिनोपॅथी) आदी तपासण्या केल्या जातील. या सर्व तपासण्या करण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. डॉक्टरांना शहरात बसूनच रुग्णाची भेट घेता येणार आहे. हे देखील महत्त्वाचे आहे कारण ग्रामीण भागात डॉक्टर शोधणे खूप कठीण आहे. या प्रकल्पात टेलीमेडिसिन उपकरणासह वाहन गावात पाठवले जाणार आहे. तेथे पॅरामेडिकलकडून रुग्णाची तपासणी करून त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठविला जाईल; व शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. या प्रकल्पात पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल; म्हणजेच तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल.

आदरणीय नितीन जी गडकरी म्हणाले कि महात्मे आय बँक आय हॉस्पिटल – एमईसीएलने हाती घेतलेला हा टेलिमेडिसिन प्रकल्प मैलाचा दगड ठरेल आणि असे अनेक प्रकल्प आगामी काळात यशस्वी होतील. हे scalable model असल्याने अनेक वर्षे उपयुक्त ठरेल. गोरगरीब, गरजू रूग्णांकरिता अनेक दशकांपासून महात्मे रूग्णालय करीत असलेल्या सेवाकार्याची त्यांनी भरभरून प्रशंसा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे

Wed Nov 17 , 2021
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक भंडारा, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!