महात्मा सम्राट राजा रावन सम्मान दिवस साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- गोंडवाना गणतंत्र पार्टी व मुलनिवासी गोंडवाना समाज बांधवा व्दारे गवलीपुरा कन्हान येथे बंडु इडपाचे यांचा निवास स्थानी विजयादशमी(दशरा) दिवसी महात्मा सम्राट राजा रावन यांच्या सम्मान दिवसी राजा रावन ची पुजा अर्चना करून सन्मान दिवस थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रामुख्याने गोंडवाना गणतंत्र पार्टी व मुलनिवासी गोंडवाना समाज बांधव सुखलाल मडावी, धनराज मडावी, बंडु इडपाचे सह आदिवासी बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत सम्राट राजा रावन यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांनी सम्राट रावन यांचा खरा इतिहास सांगुन समाजा त जागरुकता करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरीकांनी राजा रावन यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करित प्रसाद वितरण करून विजया दशमीच्या दिवसी महात्मा सम्राट राजा रावन यांचा सम्मान दिवस उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोनु मसराम, सुखलाल मडावी, बंडु इडपाची, रामलाल पट्टा, राजेश टेकाम, वासुदेव सिंध राम, गीता इडपाची, सोनम इडपाची, योगिता इड पाची, सचिन इडपाची, नितीन इडपाची, राजेश यादव, राहुल टेकाम, मदन जामकर, शिवभाऊ कुर्वे सह समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मिलेट्स का प्रचार-प्रसार समाज के लिए लाभकारी - गडकरी

Sat Oct 28 , 2023
– श्री आयुर्वेद विद्यालय में राष्ट्रीय संगोष्ठी आयोजित नागपुर :- मिलेट्स का प्रचार- प्रसार समाज के लिए अत्यंत लाभकारी है। संगोष्ठी के माध्यम से श्री आयुर्वेद महाविद्यालय यह कार्य कर रहा है। उक्त उद्गार केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी ने मिलेट्स पर आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी के उद्घाटन अवसर पर अपने संबोधन में व्यक्त किये। भारतीय वैद्यक समन्वय समिति द्वारा संचालित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com