नागपूर/वर्धा :- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:2020 लागू करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन धोरण कार्यान्वित करणे सुनिश्चित केले आहे. हिंदी विद्यापीठाने एकेडमिक बँक क्रेडिट, बहु प्रवेश व निकास, अंतरानुशासनिक अध्ययन कार्यक्रम, राष्ट्रीय एकेडमिक डिपोजिटरी, ‘स्वयम’ वर संचालित कार्यक्रमांचे क्रेडिट स्थानांतरण, भारतीय भाषांमध्ये अध्ययन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रमांचे आयोजन, पुस्तक प्रकाशन, डॉ. आंबेडकर उत्कृष्टता केंद्र, भारतीय ज्ञान परंपरेचे समावेशन, सीयूईटीत सहभागिता इत्यादी माध्यमातून महत्वाचा पुढाकार घेत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ कार्यान्वित केले असल्याची माहिती यावेळी शुक्ल यांनी दिली.
हिंदी विश्वविद्यालय (वर्धा) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वप्रथम लागू करने करणा-या संस्थांमध्ये अग्रणी आहे असे प्रतिपादनही विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी आज विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकुलगुरू द्वय प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल, प्रो. चंद्रकांत रागीट, केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य संध्या निमजे,पत्र सूचना कार्यालयाचे उपनिदेशक शशीन राय व माध्यम संचार अधिकारी धनंजय वानखेडे, कंद्रीय संचार ब्यूरो वर्धेचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, हिंदी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे उपस्थित होते.
प्रो. शुक्ल म्हणाले की विश्वविद्यालय ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ चे तीसरेही वर्धापन वर्ष साजरा करत आहे. या तीन वर्षात विश्वविद्यालयाने शिक्षण मंत्रालयाच्या दिशा-निर्देशांचे पालन करत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’चे महत्व व उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रभावी कार्यान्वयन करण्यासाठी कार्यक्रम, चर्चा, कार्यशाळा व उपक्रमाचे आयोजन केले आहे. विश्वविद्यालयाने ‘शिक्षणाची भारतीय परंपरा आणि ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ ’, ‘नवे शैक्षणिक धोरण क्रियान्वयन व आव्हाने’, ‘शैक्षणिक क्रियान्वयनात शिक्षकांची भूमिका’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : भाषा व साहित्य शिक्षणाचे आयाम’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि माध्यमे’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या क्रियान्वयनात विद्यार्थ्यांची भूमिका’, ‘नवे शैक्षिणक धोरण 2020 संदर्भात अध्यापकीय शिक्षणाचे राष्ट्रीय व्यवसायगत मानक’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्वावलंबी शिक्षण’ इत्यादी विषयांवर चर्चासत्रे आणि कार्यशाळा घेतल्या.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ हे क्रेडिट ट्रांसफरकरिता महत्वाचे आहे. विश्वविद्यालयाने विद्यार्थ्यांचे हित ध्यानात घेत ते लागू केले आहे. यासाठी इतर केंद्रीय विश्वविद्यालयांशी करारही केले जात आहेत. शिवाय सत्र 2021-22 पासून पदवी कार्यक्रमांकरिता मल्टीपल-एंट्री-मल्टीपल-एग्जिट पद्धत अवलंबिली आहे. विश्वविद्यालयात आंतर अनुशासनिक पाठ्यक्रम आधीपासूनच संचालित आहेत. नॅशनल एकेडमिक डिपोजिटरीत आतापावेतो 4781 विद्यार्थी लाभान्वित झाले आहेत. या पदव्या डिजीलॉकर पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे विद्यार्थी आपली कागदपत्रे सहजपणे प्रिंट करु शकत आहेत, अशी माहिती शुक्ल यांनी दिली.
हिंदी विद्यापीठाने विविध अभ्यास कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सत्र 2022-23 पासून केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परिक्षा – सीयूईटीचा अवलंब केला आहे. सध्या विद्यापीठात 38 पदवी कार्यक्रम चालू आहेत आणि 2023-24 मध्ये सीयूईटी अंतर्गत 41,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शालेय शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत अवलंबले जाणार असून यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबद्दल माहिती देण्यासाठी केंद्रीय विद्यालय वर्धाच्या प्राचार्या संध्या निमजे यांनी विद्यार्थ्यांना संख्यात्मक ज्ञान देण्यासाठीचे ‘निपुण भारत’ अभियान, विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ‘विद्याप्रवेश’ कार्यक्रम, बालवाटिका अशा उपक्रमांचीही माहिती दिली.