संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– बुधवार (दि.२६ ते २७) फेब्रुवारी २०२५ दोन दिवसीय महाशिवरात्री यात्रा महोत्सव.
कन्हान :- श्री शिव मंदिर देवस्थान समिती जुनीकाम ठी व्दारे पारशिवनी तालुक्यात पेंच, कन्हान, कोलार या तीन नदयाच्या त्रिवेणी संगमाच्या नदी काठावरील जुनीकामठी येथील श्री कामठेश्वर शिव मंदिरारात दोन दिवसीय महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कन्हान नदी मध्ये डावीकडुन पेंच आणी उजवी कडुन कोलार नदी समाविष्ट झाल्याने येथे तीन नदीचा त्रिवेणी संगम झाल्याने या निसर्गरम्य नदी काठावरील जुनीकामठी येथे रघुजी राजे भोसले हयानी कामठेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम केले. हे कामठेश्वर शिव मंदिर ३३९ वर्षे जुने असुन दरवर्षी महाशिवरात्री पर्वा वर मोठी यात्रा असुन श्री कामठेश्वर महादेव मंदिरात दर्शनाकरिता भाविकांची अलोट गर्दी होत असल्याने श्री शिव मंदिर देवस्थान समिती जुनीकामठी व्दारे महाशिवरात्री यात्रा महोत्सव यावर्षी बुधवार (दि.२६) फेब्रुवारी २०२५ ला पहाटे ३ वाजता श्री कामठेश्वर महादेव अभिषेकाने शुभारंभ करून सकाळी ८ वा. श्री शिव मित्र परिवार, रामायण मंडळाचे ” श्रीराम चरित मानस ” गायन आणि दिवसभर महाशिवरात्री पर्व दर्शन.
गुरूवार (दि.२७) ला सकाळी ९ वा. केजा जी महाराज भजन मंडळ जुनीकामठीचे भजन, सका ळी १०.३० वाजता हभप. श्री उमेश महाराज बहरूपी वरूड यांचा किर्तनाचा कार्यक्रम आणि दुपारी १ ते रात्री ९ वाजे पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महाशिवरात्री महोत्सवात मोठया संख्येने शिवभक्तानी शिस्तबध्य उपस्थित होऊ न श्री कामठेश्वर महादेवांच्या पुण्य दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिव मंदिर देवस्थान समिती जुनीकामठी चे कायदेशीर सल्लागार – ॲड. गजानन आसोले हयानी केले आहे. श्री कामठेश्वर शिव मंदिर जुनीकामठी महाशिवरात्री महोत्सवाच्या यशस्वितेकरि ता श्री शिव मंदिर देवस्थान समिती जुनी कामठी कार्य कारी मनोनीत अध्यक्षा- राजमाता इंदिरा राजे लक्ष्मण सिंह भोसले, अध्यक्षा – जिजा आसोले, उपाध्यक्ष- बाबुलाल हिरणवार, प्रकाश सिरिया, कोषाध्यक्ष – अनिल गंडालिया, सचिव- राजेश खंडेलवाल, सहसचिव – श्रीराम कुशवाह, युगचंद छल्लानी, उत्तम सायरे, भुषण इंगोले, प्रकाश हिरणवार, सोनु पिल्ले, विजय लांजेवार सह कामठी, जुनीकामठी, गाडेघाट, कन्हान परिसरातील भाविक मंडळी परिश्रम करित आहे.
महाशिवरात्री ला श्री कामठेश्वर महादेव मंदीरात दरवर्षी भाविक भक्ताची दर्शना करिता संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने यात्रा शांततेत सुखकर व्यव स्थित होण्याच्या दुष्टीने उपविभागीय पोलीस अधिका री संतोष गायकवाड, पोलीस स्टेशन कन्हान वरिष्ट पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात ०८ अधिकारी, ३५ पोलीस, १५ महिला पोलीस आणि ४८ होमगाड असा विशेष पोलीसाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कन्हान नदी पलीकडे कामठी पोलीसाचा सुध्दा बंदोबस्त राहणार आहे.