अरोली :- येथून जवळच असलेल्या नांदगाव येथील सार्वजनिक महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली व चौका चौकात अल्पोहार देण्यात आला, प्रभात फेरीच्या शेवट सार्वजनिक महादेव मंदिरात होऊन, भजन, अभिषेक, हवन धानोली येथील तिवारी महाराजांच्या हस्ते झाले. महाप्रसादानंतर रात्रभर विविध भजन संमेलन झाले.
याप्रसंगी सरपंच अनिल पडोळे, उपसरपंच सुनीता रामेश्वर थोटे, ग्रामपंचायत सदस्यगण बेनीराम पडोळे, मन्साराम थोटे , कैलास महादुले ,योगिता योगेश खोब्रागडे, वर्षा मन्सराम सेलोकर , उषा सुधीर आष्टणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुधीर आष्टणकर, पोलीस पाटील योगिता राजू सलामे सह गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी पुढारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक शिवशक्ती भजन मंडळाचे सदस्यगण बेबी पडोळे, गेंदा काटोके, मंदा पडोळे, ज्योती हारोडे ,सोनू पडोळे, सविता सेलोकर, वैशाली सेलोकर, शारदा थोटे, शीला धुर्वे ,वर्षा सेलोकर,वैशाली सेलोकर,अर्चना काटोके ,जागृती आंबील ढूके, महादेव मंदिराचे भक्तगण सदानंद थोटे, कचरू पडोळे, प्रकाश काटोके, ताराचंद काटोके, बेनीराम सेलोकर ,विठ्ठल पडोळे ,युवराज़ पडोळे ,महेंद्र पडोळे, विनोद आंबीलढूके ,सचिन आंबीलढूके, नीलकंठ पडोळे ,राहुल थोटे, रणधीर पडोळे, समीर चिमूरकर, सुधांशु सेलोकर, योगेश खोब्रागडे, सुरेश हारोडे सह समस्त गावकऱ्यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.