कामठी तालुक्यातील तालुकास्तरीय विविध समित्या बरखास्त..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 7 – आपल्या कार्यकर्त्याना खुश करून व त्यांच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत व्हावे त्याच बरोबर सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क होऊन त्यांच्याशी जवळकी साधता यावी यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर विविध विभागात विविध समित्या स्थापन केल्या जातात व या समितीत अशासकीय सदस्य पदी आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येते परंतु सरकार बद्दलताच ह्या समिती आपोआपच बरखास्त होतात यानुसार नुकतेच झालेल्या सत्ता परिवर्तन नुसार तत्कालीन भाजप सरकार च्या ठिकाणी महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन झाली होती त्यानंतर आता भाजप शिंदे सरकार स्थापित झाली आहे. यापूर्वी महावीकास आघाडी सरकारने गठीत केलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील शासनाच्या विविध समित्या बरखास्त झाल्या असून यानुसार कामठी तालुक्यातील विविध समित्या सुद्धा बरखास्त झाल्या आहेत तर आता या समितीच्या अशासकीय सदस्य पदासाठी नव्याने निवड केल्या जाणार आहे.

पूर्वीचे भाजप सेना युतीचे सरकार जाऊन आता कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस व शीवसेनाचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आले होते आता भाजप शिंदे सरकार स्थापित झाली आहे त्यानुसार तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्थापित केलेल्या कामठी तालुक्यातील महत्वाची संजय गांधी निराधार अनुदान वाटप या समितीसह रोजगार हमी योजना समिती, दक्षता समिती, संनियंत्रण समिती यासह इतर विविध समित्या ह्या बरखास्त झाल्या असून महावीकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्याची समितीच्या अशासकीय सदस्य पदावरून गच्छांती झाली आहे व ह्या सदस्यांना आता समिती सदस्य पदापासून मुकावे लागले आहे तर दुसरीकडे सरकार बद्दलताच बरखास्त झालेल्या समित्या आता पुन्हा केव्हा गठीत होणार याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

Mon Nov 7 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 7 :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही महिन्यांपूर्वी एका तरुणीचा खून केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच कोराडी च्या एका नामवंत शाळेतील 10 व्या वर्गाच्या अल्पवयीन शालेय विद्यर्थिनीवर स्कुल व्हॅन चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.मागील काही घटनांचा विचार केला असता. हैद्राबाद येथील डॉ प्रियंका रेड्डी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights