पेढरी ते कुसुमधरा रोड वरून पोलिस व महसुल विभागाची संयुक्त कार्यवाही, चोरीची रेती वाहतुक करणार्या टैक्टर सह दोन आरोपीना अटक

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे व पोलिस विभागाचे अधिकारी राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात संयुक्त पथकाने रविवारी ( पेंढरी (पारशिवनी ) शिवारात पेढरी ते सुवरधरा मार्गावर केलेल्या संयुक्त कारवाई मध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारा बिना नम्बर चा ट्रॅक्टर पकडला . यात एक ब्रास रेती सह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून , दोघांना अटक करण्यात आली आहे , अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली . आरोपी चंद्रशेखर फुलचंद काळसर्पे व अश्वजित प्रभू लांजेवार , दोघेही रा. निंबा , ता. पारशिवनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पेंढरी शिवारातून मोगरा नाल्या तुन रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने एक ट्रॅक्टर येताना दिसला. त्यांनी ट्रॅक्टर अडवून झडती घेतली. त्यांच्या ट्रॉलीत एक ब्रास रेती आढळून आली कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीी विना रॉयल्टी वाहतूक असल्याचे चौकशीत स्पष्ट होताच आरोपी चंद्रशेखर काळसर्पे व अश्वजित लांजेवार या दोघांना ताब्यात घेत अटक केली . त्यांच्याकडून रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या ट्रॅक्टर मधी रेती नाल्यातील असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले . ही कारवाई महसुल विभागाचे तलाठी कृष्णा माने , देवाशिष देशमुख , गणेश चव्हाण , तर पोलिस विभागातुन पोलिस हवालदार मुदस्सर जमाल , महेश फुलझेले , प्रमोद कोठे यांच्या पथकाने यशस्वी कार्यवाही केली

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टीबी मुक्त नागपूरसाठी सामाजिक संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारावे - मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

Tue Nov 15 , 2022
– परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारा टी.बी रुग्णांना पौष्टिक आहार कीटचे वाटप  नागपूर :- नागपुरातील क्षयरोग दुरीकरणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा, शहरातील विविध सामाजिक संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. नागपूर महानगरपालिका आणि परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभाग मोहिम अंतर्गत पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights