यवतमाळात आजपासून महासंस्कृती महोत्सव

Ø महोत्सवाचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

Ø गायक कैलास खेर, नंदेश उमप यांचे गायन

Ø स्थानिक लोककला, संस्कृतीचे सादरीकरण

Ø कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन

यवतमाळ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते उद्या दि.७ मार्च रोजी समता मैदान येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा गीत संगीताचा कार्यक्रम होईल.

उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.अँड.निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धीरज लिंगाडे, आ.प्रा डॉ.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.नामदेव ससाने, आ.इंद्रनिल नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड उपस्थित राहणार आहे. सदर महोत्सव सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि.7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता समई नृत्य व मंगळागौर तसेच सायंकाळी 7 वा ‘सुर नवा ध्यास नवा’ व सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल. दि.8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ढेमसा नृत्य, बंजारा लोकसंस्कृतींचा समावेश असलेला कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता दंडार नृत्य तसेच मराठी सिने अभिनेत्री माधवी निमकर, मयुरा परांडे यांचा समावेश असलेला ‘नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम व महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकारांचा विनोदी कार्यक्रम होणार आहे.

दि.9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ‘महाराष्ट्र लोककला दर्शन’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता लेंगी नृत्य तसेच सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचे गायन होईल. दि.10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मातीतून फुलले गाणे’ हा मराठी गझलेचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनशौर्यावर आधारीत पोवाडे तसेच सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत नामवंत कवींचे कविसंमेलन होणार आहे.

शेवटच्या दिवशी दि.11 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजतादरम्यान स्थानिक कलावंतांद्वारे लावणी, गोंधळ, कलापथक, कव्वाली, बंजारा लोकनृत्य, नकला व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.

विविध स्टाँल व प्रदर्शन

महोत्सवात प्रदर्शनिय दालने उभारण्यात येणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित सचित्र दालन, हस्तकला वस्तू, बचतगटांचे उत्पादन व विक्री, योजनांची माहिती देणारे दालन राहणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेले खेळ रंगमंचावर दाखविण्यात येणार आहे.

नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावे – संजय राठोड

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कला, खेळ, परंपरांचे सादरीकरण होणार आहे. प्रख्यात गायक कैलास खेर व नंदेश उमप यांचा गीत संगीताचा कार्यक्रम होईल. महोत्सवात संपूर्ण पाच दिवस विविध कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Thu Mar 7 , 2024
पुणे :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी मोहिमस्तरावर धडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com