महारेशीम अभियानाला जिल्हयात सुरुवात, रेशीम प्रचार रथाचे उदघाटन

भंडारा :- शेतक-यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हयात रेशीम उद्योगाचा प्रचार – प्रसारासाठी जिल्हयात रेशीम प्रचार रथ फिरणार आहे.या रेशीम प्रचार रथाला अति.जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ् करण्यात आला.या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ व जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर उपस्थित होते. रेशीम विकास अधिकारी माधव डिगुळे वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिलकुमार ढोले, वरिष्ठ क्षेत्र सहायक, बिजवे लिपिक ढोणे,लोहारे व सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते.

शासनाने 20.11.23 ते 20.12.24 या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यास मान्यता दिली आहे.याची सुरवात आज दि 21.11.23रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे महारेशीम अभियान कालावधीत सन2024-25 मध्ये तुती रेशीम व टसर रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत तुती रेशीम कार्यक्रम हा रेशीम विभागासोबतच कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणार आहे

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय ,मदन निवास राजीव गांधी चौक, येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईतील फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

Fri Nov 24 , 2023
– नास्वी च्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई :- नास्वी या संस्थेने मुंबईतील फेरीवाल्यांच्या स्थानिक संस्थांसोबत बांद्रा येथील रंगशारदा हॉल मध्ये एका मल्टी स्टेक होल्डर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्री हरदीप सिंग पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, भारत सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शंकर गोरे, उपायुक्त, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com