नागपूर :- महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन तर्फे शिवजयंती साजरी करून १३ वा वर्धापन दिन साजरा.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन च्यावतीने (एम.वी.टी.ए.) आपला 13 वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली प्रा.सुनिल नागदेवते यांनी केली. महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युगल रायलु यांची प्रामुख्याने प्रमुख अतिथी होती. कार्यक्रमाची सुरुववात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून जयंती साजरी केली. आपल्या भाषणात डॉ. युगल रायलु यांनी सर्व सदस्यांचे वर्धापन दिनानिमित्त अभिवादन केले. शिवाजी महाराजांसारखे आपण संघर्षशील होऊ या ते म्हणाले. या वेळेस प्रा.नागदेवते यांचा सेवा निव्रुत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. नागदेवते यांनी नवीन नेतृत्व तैयार करण्याबाबत म्हटलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांडवकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा.सुनील ठाकरे यांनी केले तर आभार प्रा.शेखर नहाते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.मनीष गोतमारे, प्रा. प्रवीण भोयर, प्रा. शेंडे, प्रा.दिपक शिंदे, आणी प्रा. काळे यांनी परिश्रम घेतले.