– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर :- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी ‘महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील दादर मधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या उद्घाटकीय भाषणानंतर संमेलनात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व किरण रिजुजू, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व व्ही. सतीश हे मार्गदर्शन करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
‘महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन’ मध्ये नागपुरातून देखील अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. नागपूरमधून मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, सुभाष पारधी, संदीप जाधव, संदीप गवई, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सतीश शिरस्वान, ऍड. राहूल झांबरे, शंकर मेश्राम, महेंद्र प्रधान यांच्यासह प्रदेश मोर्चा पदाधिकारी, विधानसभा समन्वयक, सहसमन्वयक सहभागी होणार आहेत.
‘महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन’ मध्ये मोठ्या संख्येत राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.