राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस दिन साजरा

– महाराष्ट्र पोलीस दलाची उत्कृष्ट कामगिरी: राज्यपाल बैस यांचे प्रतिपादन

मुंबई :- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सदैव तत्पर राहून, नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

गोरेगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ महाराष्ट्र पोलिस दलाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. असे गौरवोद्गार काढून राज्यपाल बैस यांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल म्हणाले की, हरियाणा येथे आयोजित आखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर -२०२३ स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने सहा सुवर्ण चार रौप्य व बारा कांस्य अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत. जागतिक पोलीस आणि फायर गेम्स २०२३विनिपेग कॅनडा येथे आयोजित कुस्ती /बॉडी बिल्डिंग/ फिझिक्स बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी तीन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण सात पदके प्राप्त केली आहेत. मुंबई येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय आणि साऊथ एशियन रब्बी स्पर्धेत- २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस रब्बी संघाने कांस्यपदक प्राप्त केले आहे. भोपाळ येथे आयोजित ६३ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी एक सुवर्ण चार रौप्य व सहा कांस्य अशी एकूण ११ पदके प्राप्त केले आहेत. गुजरात येथे आयोजित २४ व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस पाईप बँड संघाने सुवर्णपदक प्राप्त केली आहेत तसेच बिगुल संघाने सुवर्ण पदक, ब्रॉस ब्रँड संघाने कांस्य पदक प्राप्त केले आहे. तसेच बेस्ट पाईप ब्रँड प्रकारात एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस पाईप ब्रँड संघाने सलग सहा सुवर्ण पदक प्राप्त केली आहेत. अशा प्रकारे राज्याची संघभावना कायम राखून महाराष्ट्राचे नावलौकिक केले आहे. असेही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

फणसाळकर म्हणाले की, दिनांक २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो. सागरी सुरक्षा, नक्षलवादाबरोबरच सायबर सुरक्षा सारखे नवे आव्हान उभे आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. राज्यात सध्या एकूण ४८ सायबर पोलीस ठाणे व ४४ सायबर लॅब सुरू करण्यात आल्या असून अत्याधुनिक तंत्रसामुग्री पुरविण्यात येत आहेत. तसेच यावर्षी पोलीस दलामध्ये १८ हजार नवीन पदे भरण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याचेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.   

कार्यक्रमाला मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी तसेच पोलीस जवान उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जानेवारी महिन्यात महानाट्य व महासंस्कृती आयोजनाची मेजवानी

Wed Jan 3 , 2024
– जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या विविध समित्या* नागपूर :- नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाला उंचीवर नेणाऱ्या दोन मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जिल्हावासियांना जानेवारी महिन्यात मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक महानाट्य व महासंस्कृती मेळाव्याचे आयोजन होत असून या आयोजनासाठी आवश्यक समित्यांची घोषणा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!