‘खाद्य सुरक्षा मानांकनात महाराष्ट्र तिसरा’

जागतिक अन्न सुरक्षा दिवशी पुरस्काराने सन्मानित

           मुंबई : खाद्य सुरक्षेच्या बाबतीत राज्याचे उत्तम कामगिरी केली असून आज जागतिक अन्न सुरक्षा दिनी तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्याबद्दल राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे  झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला. विभागाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले आहे.

            राज्याने इट राईट‘ या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील अकरा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यात बृहन्मुंबईपुणेमिरा भाईंदर महानगरपालिकानवी मुंबईठाणेसोलापूरवर्धाऔरंगाबादलातूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.

            खाद्य सुरक्षेसंदर्भात अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध उपाय योजना केल्या जातात. यात खाद्य परवानेटेस्टींग सुविधाप्रशिक्षण आणि ग्राहकाच्या हितासाठी केलेल्या कामांच्या आधारावर हे मानांकन (FSSAI) अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणातर्फे दिले जाते. राज्याने गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध आखणी करत उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी पंधराव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याने यावर्षी सरळ तिसरे स्थान पटकावले आहे.

            मोठ्या वीस राज्यांच्या स्पर्धेत तमिळनाडूने पहिलागुजरात दुसरा तर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळविला आहे. हे मानांकन  देत असतांना राज्याने केलेली पदभरतीपरवाने वितरणअनुपालनहेल्प डेस्कआणि खाद्य विक्रेत्यांच्या तपासणीची संख्या याचाही विचार केला गेला. हे मानांकन देण्यासाठी समिती नेमण्यात आली होती ज्यात खाद्य तपासणी तज्ज्ञपोषण आहार तज्ज्ञ यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.

            नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणअन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल उपस्थित होते. मोठी वीस राज्यछोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आयुष आहार या उपक्रमाच्या लोगो‘ चे अनावरण आणि माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

क्रीडा व व्यवस्थापन संस्थेने सर्वोत्तम खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेवावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Wed Jun 8 , 2022
 मुंबई : प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डोळ्यांपुढे निश्चित असे ध्येय ठेवून वाटचाल केली पाहिजे. क्रीडा व व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनी देशासाठी सर्वोत्तम खेळाडू निर्माण करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी केले.               विनीत कर्णिक लिखित ‘बिझनेस ऑफ स्पोर्ट्स : द विनिंग फॉर्मुला फॉर सक्सेस‘ या क्रीडा व व्यवस्थापन क्षेत्रासंबंधित शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ६) राजभवन मुंबई येथे करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com