महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

 नवी दिल्लीदि. 6  : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

            जनसंपर्क अधिकारी तथा प्र.उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही आचार्य जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी पत्रकारदिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

9 जनवरी के दिन ‘वीर सावरकर - दी मैन हू कुड हैव प्रिवेंटेड पार्टिशन’ इस पुस्तक का गोवा में लोकार्पण !

Thu Jan 6 , 2022
नागपुर – भारतीय इतिहास में वीर सावरकर एवं उनका भारतीय स्वतंत्रता संघर्ष में सहभाग विस्मृत नहीं हो सकता । अंडमान की कालकोठरी में छल–यातनाएं सहन कर मातृभूमि के लिए कार्य करनेवाले वीर सावरकरजी के भाग्य में मात्र उपहास ही आया । आज भी झूठी जानकारी के आधार पर दुष्प्रचार कर उन्हें बदनाम करने का प्रयत्न किया जाता है । इसे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!