कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर, अंतर्गत कोजागिरी कार्यक्रम तीन विविध तीन गटात नुकताच घेण्यात आला. दुपारी एक वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत दीप प्रज्वलन, भगवंताचे व बाबाचे स्वागत ,पाहुण्यांचे स्वागत व चर्चा बैठकीच्या कार्यक्रम घेण्यात आला. गावातील, परिसरातील, तालुक्यातील, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित होते. माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांनी ईश्वर हेडाऊ गटाच्या कार्यक्रमात याप्रसंगी विशेष उपस्थिती लावली होती. सायंकाळी पाच पासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, कोजागिरीच्या प्रसाद वितरण करण्यापर्यंत घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तीनही गटाच्या मार्गदर्शकांच्या नेतृत्वात त्यांच्या गट अंतर्गत येणाऱ्या सेवक, सेविकांनी परिश्रम घेतले.