ड्रॅगन पॅलेस येथे पुज्यनिय भिक्कु संघाच्या उपस्थितीत महापरित्राणपाठ संपन्न..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-शेकडो धम्म उपासक उपासिकांनी घेतला लाभ

-शंभर मीटर पंचशील झेंड्यासह निघणार पंचशिल शांती मार्च

कामठी ता प्र 4:- वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे गुरुवार दिनांक 4 ते 6 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज सायंकाळी 7 वाजता पुज्यनिय भिक्कु संघाच्या उपस्थितीत माजपरित्राणपाठ करण्यात आले व हे महापरित्राणपाठ मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

बुद्धापत 2567 व्या त्रिविद पावन वैशाख पोर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भिक्कु संघाद्वारे विश्वशांतीच्या मंगल कांमनासाठी महापरित्राण पाठ चे आयोजन करण्यात आले आहे.सुरुवातीला ड्रॅगन पॅलेस येथे शेकडोच्या संख्येत उपस्थित उपासक उपसिकाद्वारे पुज्यनिय भिक्कु संघाला शील क्षमा याचना करण्यात आली.याप्रसंगी पुज्यनिय भिकू संघाद्वारे शील प्रदान व परीसुत्तपाठ करून त्रिविद पावन वैशाख पोर्णिमा या विषयावर विशेष धम्मदेसना देण्यात आली तत्पूर्वी विश्वशांतीचे अग्रदूत महाकरूनिक तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन करून पुष्प आदी अर्पण करण्यात आले.

महापरित्राण पाठ करिता पुज्यनिय भिक्कु संघामध्ये पुज्यनिय भदंत डॉ चिंचाल मेत्तानंद ,पुज्यनिय भदंत ज्योतिबोधी,पुज्यनिय भदंत नंदिता,पुज्यनिय भदंत रत्नदीपा,पुज्यनिय भदंत जयंता,पुज्यनिय भदंत ज्योतिका,पुज्यनिय भदंत नन्दामित्र, पुज्यनिय भदंत रत्नप्रिय यांची प्रमुख उपस्थिती होती .ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या वतीने पुज्यनिय भिक्षुना संघदान देण्यात आले.

शंभर मीटर लांब असलेल्या पंचशील झेंड्यानी निघणार पंचशील शांती मार्च

शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या ‘पंचशील शांती मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे .या शांती मार्च चा शुभारंभ विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथुन होणार असून ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या शांती मार्च चा समारोप होणार आहे.

याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार व कोट्यावधी समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात येईल.उल्लेखनिय आहे की पंचशील शांती मार्च करिता श्रीलंका येथून 100 मीटर पंचशील चा झेंडा मागविण्यात आलेला आहे.दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या पंचशील मार्च चे आयोजन दादासाहेब कुंभारे बहुउद्देशोय प्रशिक्षण केंद्राद्वारे करण्यात आलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बंगला चौकाचे होत आहे विदृपीकरण

Fri May 5 , 2023
सौंदर्यकरण व रुंदिकारण प्रस्तावाला अद्यापही मंजूरी नाही – पडोले कोदामेंढी :- रामर्टेक -खात -भंडारा मार्गावरील नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौदा तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध कोदामेंढी चे प्रवेश द्वाराची सुरुवात असलेल्या बंगला चौकात चारही दिशेने जाणारे येणारे प्रत्येक वाहन साठ सत्तर च्या गतिने सुसाठ वेगाने धावून येतात.त्यामुळे येथे नेहमी अपघात होतात. अपघातामुळे काही थोड़क्यात बचावले, काहीन्ना अपंगत्व आले तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com