महालगावा-मुरदाडा अपघात प्रकरण पेटले…

अमरदिप बडगे
चक्काजाम, आंदोलन पोलिसांचा लाठीचार्ज ग्रामस्थानकांची दगडफेक…
तीन पोलीस जखमी परिसरात तणाव…

गोंदिया – गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात काल बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. असुन त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. पहिला मृतदेह घेवून ग्रामस्थांनी दवनीवाडा पोलीस ठाण्यावर धावा बोलला तर आज गुरुवार, 16 जून रोजी दूसरा मृतदेह आणून गावातील बाजार चौकात ठेवून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. या दरम्यान हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रकरण एवढे तापले होते की पोलिसांनी लाठीचार्ज केले तर प्रत्युत्तरात संतप्त ग्रामस्थांनी पोलीस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. या मध्ये तीन पोळील जखमी झाले असुन परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

२०२२ के लिए अग्निपथ योजना की अधिकतम प्रवेश आयु बढ़ाई गयी

Fri Jun 17 , 2022
दिल्ली – अग्निपथ योजना के अंतर्गत सशस्त्र बलों में अग्निवीरों के लिए प्रवेश आयु 17 ½ – 21 वर्ष निर्धारित की गई थी। इस तथ्य को ध्यान में रखते हुए कि पिछले दो वर्षों के दौरान भर्ती करना संभव नहीं हुआ है, सरकार ने निर्णय लिया है कि 2022 के लिए प्रस्तावित भर्ती साइकल के लिए वन-टाइम छूट दी जाएगी। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com